ब्लॉग

आपणही या आणि जलदूत व्हा

जलदूत - दूरदृष्टीतून जलसंवर्धन क्षेत्रात क्रांती घडविणारी संस्था

Blog Image Jaldoot

महाराष्ट्रामध्ये दुष्काळातून सतत भेडसावणारी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन 'पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९' या योजनेअंतर्गत 'जलयुक्त शिवार' अभियान महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये सुरू केले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तसेच महाराष्ट्र शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात आले. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागांमध्येही पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावरही लक्ष केंद्रित केले. या अभियानामध्ये विविध विभागांकडील योजना, अशासकीय संस्था आणि लोकसहभाग यावर विशेष भर देण्यात आला. 

'जलयुक्त शिवार'चा उद्देश - 

  1. विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणे.
  2. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.
  3. भूगर्भातील पाणीपातळीत वाढ करणे.
  4. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे.
  5. पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.
  6. जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे.
  7. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
  8. अस्तित्वात असलेले पण निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे.

तत्कालीन महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या धरणांऐवजी विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करून राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करण्याचे धोरण हाती घेतले. यामध्ये लोकसहभाग वाढविला आणि जलयुक्त शिवार योजनेला लोकचळवळीचे स्वरूप मिळाले. शासनाच्या या धोरणाच्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वीच जलसंवर्धनाच्या कार्यासाठी प्रेरित होऊन मा. किशोरदादा शितोळे यांनी जलदूत संस्थेची स्थापना केली. जलदूत आणि शासनाचे जलयुक्त शिवार यांची कार्यप्रणाली, उद्दिष्टे यामध्ये बरेच साम्य आढळून येते.  जलदूत ही एक सेवाभावी संस्था आहे. भारतीय संस्था नोंदणी अधिनियमान्वये जलदूत संस्थेची नोंदणी ११ मार्च २०१४ रोजी झाली. ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था (बिगर सरकारी) आहे. आरोग्य, शिक्षण, सामाजिक व आर्थिक विकासाच्या क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनजीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी `जलदूत` अखंड कार्यरत आहे.  जलदूतने मराठवाड्यात अनेक जलसंधारण प्रकल्प हाती घेतले आणि पूर्ण केले. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची उन्नती आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जलदूतने हातभार लावला. या कार्यासाठी शासनाने जलदूतचा अनेक पुरस्कारांनी गौरव केला. राज्यभरात सामाजिक व जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी या संस्थेचे कौतुक केले.

`जलदूत`ची उद्दिष्टे- 

  1. महाराष्ट्र राज्यात विशेषतः ग्रामीण भागांतील लोकांना आजही पाणीटंचाईच्या प्रश्नाचा तीव्रतेने सामना करावा लागतो. अशाच अनेक खेड्यांची पाणीटंचाईतून मुक्तता करण्याचे काम जलदूतच्या माध्यमातून केले जाते. 
  2. जलसंधारणविषयीची जागरूकता व तंत्राचा अभाव असल्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील लोकांची पाण्याची गरज अद्यापही भागलेली नाही. 
  3. जलदूतच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण केली जाते.
  4. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी जलदूतच्या माध्यमातून ठोस कृती कार्यक्रम राबविले जातात.
  5. जलदूतने आखलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात.  
  6. ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण, पर्यावरण जागरूकता, स्वच्छतेच्या बाबतीत विविध उपक्रम राबविले जातात. 
  7. अतिदुर्गम भागातील खेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, बाल देखभाल केंद्रांमध्ये वाढ झाली तर जनतेची आरोग्य स्थिती सुधारण्यास मदत होईल.
  8. ग्रामीण भागातून बालकामगार प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  9. मुलगा आणि मुलगी एकसमान अशी भावना ग्रामीण भागात रुजवून लिंग समानतेविषयी जनजागरण केले जाते.

समुदाय-आधारित जलसंधारण एककांची स्थापना करून त्यांची संख्या वाढविता येईल. या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक सलोखा, पाणी वापराविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर आणि त्यानंतरच्या भूजलाचे पुनर्भरण यांची स्थिती अद्याप चांगली आहे. तरीही पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी देशभरात पुढाकार घेण्याची गरज आहे.

अभ्यास व संशोधनातून पाणी अडविण्याचे तंत्रही बदलत आहे. अभियंत्यांनी बंधाऱ्याच्या बांधणीमध्ये केलेले प्रयोग आता या क्षेत्रात उल्लेखनीय ठरू लागले आहेत. पूर्वी पाणलोटाच्या कामात पाणी अडविण्यासाठी ‘गॅबियन बंधारा’ बांधला जात असे.  त्याच्या आरेखनात बदल करून जलदूतच्या माध्यमातून नव्या पद्धतीचा फेरोसिमेंट बंधारा बांधला जात आहे.  मराठवाडय़ातील विशेषतः ग्रामीण भागात पाण्यासाठी काम करणाऱ्या जलदूतने शेतकऱ्यांच्या मदतीने नवनवीन प्रयोग हाती घ्यायला सुरुवात केली आहे.

चला, जलदूतमध्ये सहभागी होऊन... जलदूतविषयी आणखी जाणून घ्या...!

कॉल करा