जलदूतची दूरदृष्टी
“ ग्रामीण जनतेला त्यांच्या इष्टतम क्षमतेपर्यंत पोचविण्यासाठी प्रेरणा आणि सुसज्ज करणे ”
ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून दिली तर त्यांच्यात एक निराळा आत्मविश्वास निर्माण होईल. ग्रामीण जनतेला स्वविकासासाठी प्रेरणा देण्याची खरी गरज आहे. आम्हाला विश्वास आहे की, मानवाच्या मूलभूत गरजांपैकी ग्रामीण भागातील लोकांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले तर ते त्यांचे जीवन नक्कीच बदलू शकते. शेतीसाठी अत्यावश्यक असते पाणी. शेती समृद्ध झाली तर ग्रामीण भागातील दारिद्र्य, उपासमारीच्या संकटावर निश्चितच विजय मिळविता येईल.
जलदूतचे ध्येय
“ पाणीटंचाईचा प्रश्न सोडवू नवीन पद्धतीने... ”
ग्रामीण भागाच्या विकासासाठी जलदूत समूह कार्यरत आहे. ग्रामीण जनतेत जलसंधारणाचे तंत्र आणि पाणी वापराविषयी जागरूकता निर्माण करणे, जलसंधारणास प्रोत्साहन देणे, लोकांना शिक्षित करणे आणि विकासापासून वंचित असलेल्या ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे हे जलदूतचे ध्येय आहे. जलसंधारण पद्धती, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र वापरून पाण्याची उपलब्धता निश्चितच वाढेल. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन, महिला सबलीकरण, बाल शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रात प्रयत्नांची गरज आहे. ग्रामीण जनतेस शुद्ध आणि स्वछ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, हे उद्दिष्ट जलदूत नक्कीच साध्य करेल.