आमच्याबद्दल

आपणही या आणि जलदूत व्हा

जलदूत बद्दल

जलदूत ही एक सेवाभावी संस्था आहे. आरोग्य, शिक्षण, सामाजिक व आर्थिक विकासाच्या क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी `जलदूत` अखंड कार्यरत आहे. भारतीय संस्था नोंदणी अधिनियमान्वये जलदूत संस्थेची नोंदणी 11 मार्च 2014 रोजी झाली. ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था (बिगर सरकारी) आहे.

जलदूतने मराठवाड्यात अनेक जलसंधारण प्रकल्प हाती घेतले आणि पूर्ण केले. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची उन्नती आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जलदूतने हातभार लावला. या कार्यासाठी शासनाने जलदूतचा अनेक पुरस्कारांनी गौरव केला. राज्यभरात सामाजिक व जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी या संस्थेचे कौतुक केले.

`जलदूत`ची उद्दिष्टे

  • महाराष्ट्र राज्यात विशेषतः ग्रामीण भागांतील लोकांना आजही पाणीटंचाईच्या प्रश्नाचा तीव्रतेने सामना करावा लागतो. दुष्काळग्रस्त स्थिती ही जणू काही त्यांच्या पाचवीला पुजली आहे. अशाच अनेक खेड्यांची पाणीटंचाईतून मुक्तता करण्याचे काम जलदूतच्या माध्यमातून केले जाते. जलसंधारणविषयीची जागरूकता व तंत्राचा अभाव असल्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील लोकांची पाण्याची गरज अद्यापही भागलेली नाही. जलदूतच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण केली जाते.

  • उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करून ग्रामीण भागात जलसंधारण चळवळ रुजायला हवी.

  • ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी जलदूतच्या माध्यमातून ठोस कृती कार्यक्रम राबविले जातात.

  • जलदूतने आखलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

  • ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण, पर्यावरण जागरूकता, स्वच्छतेच्या बाबतीत विविध उपक्रम राबविले जातात. अतिदुर्गम भागातील खेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, बाल देखभाल केंद्रांमध्ये वाढ झाली तर जनतेची आरोग्य स्थिती सुधारण्यास मदत होईल.

  • ग्रामीण भागातून बालकामगार प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • मुलगा आणि मुलगी एकसमान अशी भावना ग्रामीण भागात रुजवून लिंग समानतेविषयी जनजागरण केले जाते.

kishore-shitole-jaldoot-organization-drinking-water-and-sanitation-Water-Conservation-Water-Harvesting-Cleaning-of-water-Environmental-hygiene

आमचे कार्य

जलसंधारणाच्या अद्ययावत तंत्राद्वारे ग्रामीण भागातील विहिरी, साठवण तलाव, नद्या, ओढे यासारख्या पारंपरिक जलसाठ्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे. आभाळातून पडणारे पावसाचे पाणी आणि पृष्ठभागावरील पाण्याचे प्रवाह, साठवण तलाव हे प्रमुख जलस्त्रोत आहेत.

समुदाय-आधारित जलसंधारण एककांची स्थापना करून त्यांची संख्या वाढविता येईल. या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक सलोखा, पाणी वापराविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण होईल.

रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर आणि त्यानंतरच्या भूजलाचे पुनर्भरण यांची स्थिती अद्याप चांगली आहे. तरीही पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी देशभरात पुढाकार घेण्याची गरज आहे.

चला, जलदूतमध्ये सहभागी होऊन... जलदूतविषयी आणखी जाणून घ्या...!

कॉल करा