ब्लॉग

आपणही या आणि जलदूत व्हा

तुम्हाला फेरोसिमेंट माहित आहे का? चला जाणून घेऊया सविस्तर

Blog Image Jaldoot

फेरोसमेंट हे एक बांधकाम साहित्य आहे ज्यामध्ये वायरची जाळी आणि सिमेंट मोर्टार असते. कमी वजन, कुशल मनुष्यबळाचा अभाव, संरचनेची गरज नसल्यामुळे, बांधकामात फेरोसमेंटचा वापर खूप विस्तृत आहे. हे 1940 मध्ये PLNervi या इटालियन आर्किटेक्टने विकसित केले होते. फेरोसमेंट कामांची गुणवत्ता सुनिश्चित केली जाते कारण घटक मशीनरीवर तयार केले जातात. याचा देखभाल खर्च कमी लागतो. ही सामग्री गेल्या दोन दशकांत बांधकाम कामांम ध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. फेरोसमेंटचे गुणधर्म • हे प्रबलित कंक्रीटचे अत्यंत बहुमुखी स्वरूप आहेत. • हे एक प्रकारचे पातळ प्रबलित कंक्रीट बांधकाम आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लहान व्यासाच्या तारा संपूर्ण क्रॉस विभागात एकसमानपणे जोडल्या जातात. • काँक्रीटच्या जागी पोर्टलँड सिमेंट मोर्टार वापरला जातो. • ताकद दोन घटकांवर अवलंबून असते: वाळू/सिमेंट मोर्टार मिक्सची गुणवत्ता आणि वापरलेल्या मजबुतीकरण सामग्रीचे प्रमाण. भारतातील फेरोसिमेंटची प्रगती : भारतात खेडोपाडी “कुडाच्या भिंती” उभारून घरे बांधण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. त्याचीच शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धत म्हणून फेरोसिमेंटकडे पाहिले पाहिजे. सत्तरच्या दशकात रुरकी आणि मद्रास येथील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमधे फेरोसिमेंटवर काम सुरू झाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या आणि भारतात फेरोसिमेंट रुजण्यास सुरुवात झाली पण ते फोफावले नाही. फेरोसिमेंटची सद्य:स्थिती जाणून घेऊया सविस्तर फेरोसिमेंटकडे पहिल्यापासूनच “आरसीसी” ची कमी जाडीची आवृत्ती म्हणून पाहिले जाते व त्याची व्याख्याही असेच सांगते. त्यामुळे त्याचे संकल्पनही आरसीसी सारखेच केले जात होते. फेरोसिमेंटचे उपजत गुण म्हणजे भरपूर ताण सहन करण्याची शक्ती (tensile strength), एकसंधता, लवचिकता, आणि धक्के सहन करण्याची क्षमता हे लक्षात न घेताच अभिकल्प केले जात असे व त्यामुळे जगभरात फेरोसिमेंटचा वापर जास्त वजन सहन करावे लागणार नाही, अशा बांधकामासाठीच केला जात होता. हे चित्र बदलले जेव्हा पुण्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये, प्रत्यक्ष बांधकामासाठी फेरोसिमेंटचा उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन हाती घेतले गेले तेव्हा. जवळ जवळ तीस संशोधन प्रकल्पातून फेरोसिमेंटचा संरचनात्मक सामग्री (Structural Material) म्हणून अभ्यास केला गेला. फेरोसिमेंटच्या गुणधर्मानुसार त्याचे संकल्पन करून ते प्रत्यक्षात कसे बसते हे सिद्ध केले गेले. त्यानुसार अनेक मोठ्या आकाराची बांधकामे करून घेऊन त्याचा पडताळाही घेतला गेला. २००७ मध्ये पुण्यात फेरोसिमेंट सोसायटी (इंडिया) ची स्थापना झाली. सोसायटीच्या सभासदांनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विविध क्षेत्रांत फेरोसिमेंटचा वापर करून, त्याचा केवळ साध्या बांधकामासाठीच नाही, तर संरचनात्मक सामग्री म्हणून वापर कसा करता येतो हे दाखवून दिले आणि त्यातून फेरोसिमेंट तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडून आले. ते सर्वव्यापी झाले आहे. फेरोसिमेंट सोसायटीने सर्व पातळ्यांवर प्रयत्न करून फेरोसिमेंट तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. पुणे विद्यापीठात फेरोसिमेंट हा विषय BE आणि ME च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलाआहे. त्यासाठी लागणारी क्रमिक पुस्तके लिहून घेतली आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. दर दोन वर्षांनी नॅशनल कॉन्व्हेंशन्स (राष्ट्रीय अधिवेशन) आयोजित केली जातात, त्यात भारतातील फेरोसिमेंटवर काम करणारे लेख प्रसिद्ध करतात. आतापर्यंत अशी पाच कॉन्व्हेंशन्स झाली आहेत. फेरोसिमेंटसाठी भारतीय मानक विनिर्देश (Indian Standard Specification) मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. सोसायटीच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारने फेरोसिमेंट हँडबुक प्रसिद्ध केले आहे. बांधकाम क्षेत्रात फेरोसिमेंटविषयी सल्लाही सोसायटी देते. सोसायटी अनेक संशोधन प्रकल्पांचे प्रायोजकत्व स्वीकारते. या सर्व गोष्टींवरून हे सिद्ध होते की फेरोसिमेंटला उज्ज्वल भविष्य आहे.

चला, जलदूतमध्ये सहभागी होऊन... जलदूतविषयी आणखी जाणून घ्या...!

कॉल करा