Water Drop

जलदूतबद्दल

आपणही या आणि जलदूत व्हा

`जलदूत` ही एक `ना नफा, ना तोटा` या तत्वावर चालणारी सामाजिक संस्था आहे. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक उपक्रमांच्या माध्यमातून समाज घटकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे. या दृष्टीने संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात.

`जलदूत`ची स्थापना ११ मार्च २०१४ रोजी भारतीय संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत करण्यात आली. जलदूतने मराठवाड्यात अनेक जलसंधारण प्रकल्प हाती घेतले आणि ते पूर्ण केले आहेत. ग्रामीण जनतेच्या उन्नतीसाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास `जलदूत`ने हातभार लावला.

समाज विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल शासनाकडून `जलदूत`ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरावर या संस्थेचे कौतुक करण्यात आले.

पुढे वाचा

जलदूतचे ध्येय

“ पाणीटंचाईचा प्रश्न सोडवू नवीन पद्धतीने... ”
ग्रामीण भागाच्या विकासासाठी जलदूत समूह कार्यरत आहे. ग्रामीण जनतेत जलसंधारणाचे तंत्र आणि पाणी वापराविषयी जागरूकता निर्माण करणे, जलसंधारणास प्रोत्साहन देणे, लोकांना शिक्षित करणे आणि विकासापासून वंचित असलेल्या ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे हे जलदूतचे ध्येय आहे. जलसंधारण पद्धती, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र वापरून पाण्याची उपलब्धता निश्चितच वाढेल. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन, महिला सबलीकरण, बाल शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रात प्रयत्नांची गरज आहे. ग्रामीण जनतेस शुद्ध आणि स्वछ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, हे उद्दिष्ट जलदूत नक्कीच साध्य करेल.

पुढे वाचा

जलदूतची दूरदृष्टी

“ ग्रामीण जनतेला त्यांच्या इष्टतम क्षमतेपर्यंत पोचविण्यासाठी प्रेरणा देणे आणि सुसज्ज करणे ”
ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून दिली तर त्यांच्यात एक निराळा आत्मविश्वास निर्माण होईल. ग्रामीण जनतेला स्वविकासासाठी प्रेरणा देण्याची खरी गरज आहे. आम्हाला विश्वास आहे की, मानवाच्या मूलभूत गरजांपैकी ग्रामीण भागातील लोकांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले तर ते त्यांचे जीवन नक्कीच बदलू शकते. शेतीसाठी अत्यावश्यक असते पाणी. शेती समृद्ध झाली तर ग्रामीण भागातील दारिद्र्य, उपासमारीच्या संकटावर निश्चितच विजय मिळविता येईल.

पुढे वाचा

व्हिडिओ गॅलरी

जलदूत कार्य

सातारा येथील बारव `जलदूत`ने केली पुनरुज्जीवित

सातारा येथील बारव `जलदूत`ने केली पुनरुज्जीवित

औरंगाबाद शहराजवळ सातारा हे गाव प्रसिद्ध आहे. श्री खंडोबाचे येथे प्राचीन हेमाडपंती मंदिर असल्याने दरवर्षी…

पुढे वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे जलदूतने बांधलेला बंधारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे जलदूतने बांधलेला बंधारा

`जलदूत`च्या बंधाऱ्यामुळे विद्यापीठाचा वाचला खर्च. `जलदूत` या संस्थेद्वारे जलसंधारण क्षेत्रात आजवर मोठमोठी…

पुढे वाचा
मी पाहिलेला जलदूत

मी पाहिलेला जलदूत

ही गोष्ट साधारण जुलै महिन्यातील असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठातील महर्षी शिंदे वसतिगृहात…

पुढे वाचा

वृत्तपत्र माध्यम

प्रशंसापत्रे

Customer Testimonails

जलदूतचे मार्गदर्शन व लोकसहभागातून आमच्या गावातील ऐतिहासिक बारव पुनरुज्जीवित झाली. पावसाळ्यात ही बारव तुडुंब भरेल आणि उन्हाळा व पाणीटंचाईमध्ये नकीच उपयोगी ठरेल.

ग्रामस्थ, सातारा
Customer Testimonails

बारवेचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर गावाला खूप आनंद झाला. आदरणीय किशोरजी शितोळे यांच्या नेतृत्वाखाली हे काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने झाले. त्यांची काम करण्याची पद्धती व दूरदृष्टी खरेच वाखाणण्यासारखी आहे.

ग्रामस्थ, सातारा
Customer Testimonails

गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली पुरातन बारव आहे. ही बारव बरेच वर्षांपासून ओस पडली होती. जवळपासच्या लोकांनी टाकलेला कचरा, दगड-माती यामुळे ही बारव बुजत व ढासळत (खचत) चालली होती. या बारवेला अनेक वर्षांपूर्वी पाणी होते, असे जुने वृद्ध सांगत असत. जलदूतमुळे गावातील ही ऐतिहासिक बारव पुनरुज्जीवित झाली.

ग्रामस्थ, सातारा
Customer Testimonails

किशोर शितोळे यांनी गावातील युवकांना संघटित करून, सामाजिक व सार्वजनिक कार्याचे महत्व पटवून दिले. आम्ही गावकर्‍यांनी लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वर्गणी दिली.

ग्रामस्थ, सातारा

चला, जलदूतमध्ये सहभागी होऊन... जलदूतविषयी आणखी जाणून घ्या...!

कॉल करा